आधुनिक दुग्ध व्यवसाय उद्योजकता विकास प्रशिक्षण दि.21 ते 25 ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा
अकोला,दि. 17(जिमाका)- महाराष्ट्र
पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व
पशुविज्ञान संस्थेतर्फे सोमवार दि. 21 ते
शुक्रवारी दि. 25 या कालावधीत ‘आधुनिक दुग्धव्यवसाय
उद्योजकता विकास प्रशिक्षण’ या विषयावर सकाळी 10 ते दुपारी दोन वाजेपर्यंत ऑनलाईन कार्यशाळा
आयोजित करण्यात आली
आहे, अशी माहिती स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान
संस्थाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या कार्यक्रम
पत्रिकेत म्हटले आहे की, या प्रशिक्षणात
कमी खर्चात शास्त्रोक्त पद्धतीने हा व्यवसाय कसा करावा? यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पशुतज्ज्ञ व उद्योजक डॉ. एस.पी. गायकवाड तर
प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरु
डॉ. ए.एम. पातुरकर, विस्तार प्रशिक्षणचे संचालक प्रा. डॉ. व्ही. डी. आहेर, शिक्षण
व अधिष्ठाताचे संचालक प्रा. डॉ. ए. पी. सोमकुवर, संशोधन
संचालक प्रा. डॉ. एन. व्ही. कुरकुरे यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा