ध्वजदिन निधीत योगदान द्या- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 




अकोला,दि.११ (जिमाका)- देशाच्या सिमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध हितकारी उपक्रमांमध्ये योगदान देण्यासाठी ध्वजदिन निधी संकलित केला जातो. या निधीत प्रत्येकाने आपापले योगदान देऊन सैनिकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करावी. सर्व विभागांनी ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट  ३१ जानेवारी २०२१ पूर्वी पूर्ण करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.

 जिल्ह्यातील ध्वजदिन निधी संकलनास आज जिल्हा नियोजन भवन येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, श्रीकांत देशपांडे, रामेश्वर पुरी, विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी व प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, सदाशिव शेलार, जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आपल्या निधीचे योगदान देऊन  या मोहिमेचा शुभारंभ केला.  तसेच गतवर्षी उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलन केलेल्या जिल्हा परिषद,  पोलीस अधिक्षक कार्यालय,  प्रादेशिक परिवहन कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग या कार्यालयांचा सन्मान करण्यात आला.  तसेच यावेळी माहिती देण्यात आली की गेल्या वर्षी ६८ लाख ३० हजार रुपये इतक्या निधी संकलनाचे उद्दिष्ट होते त्यापैकी ९८ टक्के उद्दिष्ट हे पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ