रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 118 चाचण्या, सात पॉझिटिव्ह

 अकोला,दि.1 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 118 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे 13, बाळापूर येथे एक, बार्शी टाकळी येथे 11,  मुर्तिजापूर येथे सात जणांची चाचणी झाली. त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. तेल्हारा येथे 25 जणांची चाचणी झाली त्यात दोन जण पॉझिटीव्ह आले. 15 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या  त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाहीत. तर जीएमसी येथे 34 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर हेडगेवार प्रयोगशाळेत 12 चाचण्या होऊन एक जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आजपर्यंत 25356 चाचण्या झाल्या त्यात 1793 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना