ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकः प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध; हरकती सोमवार दि.7 पर्यंत स्विकारणार
अकोला,दि.1 (जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून त्यानुसार जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकीकरीता आज दि.1 रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. या मतदार याद्यांवर आक्षेप व हरकती घेण्यासाठी सोमवार दि.7 पर्यंत अंतिम मुदत आहे. या हरकती संबंधित तहसिल कार्यालयात स्विकारण्यात येतील. त्यानंतर अंतिम मतदार याद्या गुरुवार दि.10 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रामपंचायत निवडणूक विभाग संजय खडसे यांनी कळविले आहे. याद्या प्रसिद्ध झालेल्या ग्रामपंचायतींचा तपशिल या प्रमाणे- तेल्हारा तालुका 34 ग्रामपंचायती, अकोट 38. मुर्तिजापूर 29, अकोला 36, बाळापूर38, बार्शी टाकळी 27, पातुर 23 अशा एकूण 225 ग्रामपंचायतींमध्ये प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा