रेडक्रॉसच्या ‘मास्क वाटप’अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ

 


अकोला,दि.२९ (जिमाका)- कोविड १९ च्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी मास्क वापरणे हा एक प्रभावी उपाय आहे. या पार्श्वभुमिवर  इंडियन रेडक्रॉस संस्थेच्या अकोला शाखेच्या वतीने मास्क वाटप हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम स्तुत्य असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. आज रेडक्रॉस या संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते मास्क वाटप करण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. किशोर मालोकार, ॲड. महेंद्र साहू,  प्रभजितसिंह बछेर, राजाभाऊ देशमुख, अरुंधतीताई शिरसाट, ॲड. सुभाष मुंगी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ