भव्‍य राज्‍यस्‍तरीय महारोजगार मेळाव्‍यास 20 डिसेंबरपर्यत मुदतवाढ


            अकोला,दि. 15(जिमाका)- जिल्ह्यातील  बेरोजगार युवक युवतींना विविध क्षेत्रात नव्‍याने निर्माण होत असलेल्‍या संधी उपलब्‍ध करुन देण्‍याच्‍या दृष्‍टीने कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागा मार्फत 1213 डिसेंबर रोजी पर्यत भव्‍य राज्‍यस्‍तरीय महारोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यांत आले होते. परंतू महारोजगार मेळाव्‍यास उमेदवारांचा वाढता प्रतिसाद पाहता मेळाव्‍यात अर्ज करण्‍यांची अंतिम दि. 20 डिसेंबरपर्यत मुदतवाढ करण्‍यांत आलेली आहे.

 

            भव्‍य राज्‍यस्‍तरीय महारोजगार मेळाव्‍यामध्‍ये नामांकित 400 पेक्षा जास्‍त कंपन्‍यांनी आपला सहभाग नोंदवून त्‍यांचेकडील विविध 70 हजार पेक्षा जास्‍त रिक्‍तपदे अधिसुचीत केलेली आहेत. महारोजगार मेळाव्‍यात सहभागी होण्‍यासाठी इच्‍छूक युवक-युवतींनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्‍थळाला भेट देऊन होम पेजवरील नोकरीसाधक ( Job Seeker) लॉग इन मध्‍ये आपल्‍या युझर आय डी व पासवर्डच्‍या आधारे लॉग इन व्‍हावे. त्‍यानंतर  डॅशबोर्डमधील पंडीत दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा  या बटनांवर क्लिक करुन प्रथम आपल्‍याला पाहीजे तो जिल्‍हा निवडून त्‍यातील  स्‍टेट लेवल मेगा जॉब फेअर या रोजगार मेळाव्‍याची निवड करावी त्‍यानंतर कंपनी निहाय त्‍यांचे कडील रिक्‍तपदांची माहिती घेऊन तसेच आवश्‍यक शैक्षणीक अर्हतेनुसार  पदांची निवड करुन ऑनलाईन अप्‍लॉय ( Apply ) करुन आपला सहभाग नोंदवावा तसेच या रोजगाराच्‍या  सुवर्णसंधीचा जास्‍तीत जास्‍त युवक युवतींनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयूक्त प्रां.यो.बारस्‍कर यांनी केले आहे.

महारोजगार मेळाव्‍यात सहभाग नोंदविल्‍या नंतर निवड केलेल्‍या कंपनी किवा उद्योजकांच्‍या सोईनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक वेळ एसएमएस, दुरध्‍वनी ईमेलव्‍दारे किंवा इतर सोईच्‍या माध्‍यमाव्‍दारे कळविण्‍यात येईल व शक्‍य असेल तिथे ऑफलाईन किंवा ऑनलाईन मुलाखती घेण्‍यात येईल. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ