अकोला येथील न्याय सेवा सदनाचे शनिवारी (दि.१२) ई-उद्घाटन

 अकोला,दि.११ (जिमाका)- येथील वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नवीन इमारतीचे अर्थात न्याय सेवा सदन या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या नवीन इमारतीचे शनिवार दि.१२ रोजी  सकाळी ११ वाजता ई उद्घाटन होणार आहे, असे  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव स्वरुपकुमार बोस यांनी कळविले आहे.

यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा न्यायालय अकोला येथील  ‘न्याय सेवा सदन’ या  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या नवीन न्यायालय इमारतीचा  ई- उद्घाटन समारंभ शनिवार दि.१२ रोजी  सकाळी ११ वाजता होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  तथा  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष ए.ए. सय्यद  यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे.  यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती  झेड.ए. हक, राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव अभय मंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यनशिवराज खोब्रागडे हे राहणार आहेत.  या उद्घाटन सोहळ्यात  जिल्हा न्यायालय अकोलाच्या  https://districts.ecourts.gov.in/akola  या संकेतस्थळावर जाऊन https://youtube/rwxMGn9kl-A  या लिंकवर  क्लिक करुन सहभागी होता येईल. हा सोहळा जिल्हा व सत्र न्यायालय अकोला परिसर, स्टेशन रोड येथे होणार आहे, असे वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. आनंद ओ. गोदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोलाचे सचिव स्वरुपकुमार बोस यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ