रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात ५२९ चाचण्या; ११ पॉझिटीव्ह


अकोला,दि. 31(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या ५२९ चाचण्या झाल्या त्यात ११ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात  अकोट येथे २२ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर बार्शिटाकळी येथे २१५, बाळापूर येथे ११५, तेल्हारा येथे १०२, मुर्तिजापूर येथे १३, अकोला आयएमए येथे तीन तर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या २३ चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३६ चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात २९ हजार ४३३ रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी १९३७ पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ