568 अहवाल प्राप्त; 29 पॉझिटीव्ह, 14 डिस्चार्ज


अकोला,दि. 18(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 568 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 539 अहवाल निगेटीव्ह तर 29 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  तर 14 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.17) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  10079(8073+1829+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  65283 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 63709 फेरतपासणीचे 266 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1308 नमुने होते. आजपर्यंत एकूण 65069 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 56996 तर पॉझिटीव्ह अहवाल 10079(8073+1829+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 29 पॉझिटिव्ह

 आज दिवसभरात 29  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी 23 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व 14 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील सहा, जूने राधाकिशन प्लॉट येथील तीन, खरप रोड व सोपीनाथ नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पारस, सिध्दी कॅम्प, आदर्श कॉलनी, मलकापूर, मोठी उमरी, लहरीया नगर, गोरक्षण रोड, व्हीएचबी कॉलनी, उरळ ता. बाळापूर व रामदास पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी  सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व एक पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड येथील दोन, तर उर्वरित डाबकी रोड, स्वस्तिक सोसायटी, केशव नगर व न्यु तापडीया नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री (दि.17)रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

14 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, सुर्यचंद्रा हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन जणांना अशा एकूण 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

737 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 10079(8073+1829+177)आहे. त्यातील 306 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 9036 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 737 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम