558 अहवाल प्राप्त; 26 पॉझिटीव्ह, 102 डिस्चार्ज


अकोला,दि. 25(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 558 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 532 अहवाल निगेटीव्ह तर 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 102 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.24) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  10313(8277+1859+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  68484 जणांचे  पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 66853 फेरतपासणीचे 277 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1354 नमुने होते. आजपर्यंत एकूण 68264 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 59987 तर पॉझिटीव्ह अहवाल 10313(8277+1859+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 26 पॉझिटिव्ह

 आज दिवसभरात 26  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 10 महिला व 16 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मूर्तिजापूर येथील तीन, बार्शीटाकली, बाळापूर व माधव नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित मोरझरी ता. बाळापूर, तापडीया नगर, बातूर अकोट, मलकापूर, सुधीर कॉलनी, देशमुख फैल, मोठी उमरी, रामदास पेठ, टॉवर चौक, बिर्ला रोड, शास्त्री नगर, रणपिसे नगर, अकोट फैल, तोष्णीवाल लेआऊट, गायगाव, गांधी चौक व किनखेड पूर्णा ता. अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी  कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

दरम्यान काल रात्री (दि.24)रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

102 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 15, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, स्कायलार्क हॉटेल येथून एक तर ओझोन हॉस्पिटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 80 अशा एकूण 102 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

635 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 10313(8277+1859+177) आहे. त्यातील 315 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 9363 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 635 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ