राजर्षी छत्रापती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृती व गुणवत्ता पुरस्कार 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ


अकोला,दि. 15(जिमाका)- सन 2016-17 ते 2019-20 या कालावधीत सामाजिक न्याय विभागामार्फत येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृती व शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार या योजनेच्या लाभाची रक्कम, खाते क्रमांक किवा खाते तपशिल चुकीचा असल्यामुळे खात्यात रक्कम जमा झालेली नाही अशा विद्यार्थ्यांचे खाते तपशिल दुरुस्त करुन संबधित शाळा किवा महाविद्यालय मार्फत या कार्यालयास दि. 26 जून 2020 पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

 सदर योजनेला आता 24 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात येत असून विद्यार्थ्यांचे खाते  तपशिल दुरुस्ती करुन घ्यावे. यानंतर प्राप्त निवेदनाचा विचार केला जाणार नाही व रक्कम शासन खाती जमा करण्यात येईल. याची सर्व मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयानी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ