रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 106 चाचण्या, चार पॉझिटिव्ह

 


अकोला,दि.9 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 106 चाचण्या झाल्या त्यात चार  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे 18, तेल्हारा येथे 23  मुर्तिजापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तसेच  अकोला आयएमए येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, आरोग्य कर्मचारी येथे 21 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 26 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, हेडगेवार प्रयोगशाळा येथे सहा चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  असे एकूण 106 जणांच्या चाचण्या होऊन चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंत 26499 चाचण्या झाल्या त्यात 1836 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ