१४६२ अहवाल प्राप्त; ४७ पॉझिटीव्ह, नऊ डिस्चार्ज

 अकोला,दि. ११ (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १४६२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४१५अहवाल निगेटीव्ह तर ४७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि.१०) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  ९८२४(७८५२+१७९५+१७७) झाली आहे. आज दिवसभरात नऊ  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  ५९५१८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५८०६०  फेरतपासणीचे २६२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ११९६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५९३१२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५१४६० तर पॉझिटीव्ह अहवाल ९८२४(७८५२+१७९५+१७७) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज ४७ पॉझिटिव्ह

 आज दिवसभरात ४७  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी २६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १० महिला व १६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील पाच, रामदास पेठ येथील दोन, तर उर्वरित शिवाजी चौक, जठारपेठ, चिखलगाव, शिवानी, तुळजापूर ता. पातूर, जिएमसी हॉस्टेल, जुने शहर,खेडकर नगर, बार्शीटाकली, सिटी कोतवाली, केडीया प्लॉट, कुबेर नगर, खेतान नगर, कौलखेड, बोरगाव मंजू, माळीपूर, मोठी उमरी, रतनलाल प्लॉट व  कापशी तलाव येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे.  तर आज सायंकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व १६ पुरुष आहेत.  त्यातील चार जण स्वराज पेठ येथील, दोन जण कॉटन मार्केट अकोट, दोन जण सिंधी कॅम्प, दोन जण अकोट फैल, दोन जण गोरक्षण रोड तर उर्वरीत कळंबा बु ता.बाळापूर, नानखेड, उदळ, रामनगर, गजानन नगर, जीएमसी, डाबकी, जगजीवनराम नगर, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री (दि.१०) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

नऊ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर सुर्यचंद्र हॉस्पिटल येथुन एक, हॉटेल रिजेन्सी येथून  दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून  पाच अशा एकूण नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

७२५ रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या ९८२४(७८५२+१७९५+१७७)आहे. त्यातील ३०१ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची ८७९८ संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ७२५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ