317 अहवाल प्राप्त; 25 पॉझिटीव्ह, 20 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू
अकोला,दि.8 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 317 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 292 अहवाल निगेटीव्ह तर 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज खाजगी हॉस्पीटल येथे एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.7) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 9705(7748+1780+177) झाली आहे. आज दिवसभरात 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 56632 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 55218 फेरतपासणीचे 258 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1156 नमुने होते. आजपर्यंत एकूण 56620 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 48872 तर पॉझिटीव्ह अहवाल 9705(7748+1780+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 25 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 19 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व 13 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जठारपेठ येथील तीन जण, गोरक्षण रोड, डाबकी रोड, उन्नती नगर, कौलखेड व रामदासपेठ येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बिर्ला कॉलनी, आदर्श कॉलनी, तापडीया नगर, मलकापूर, दिपक चौक व बैदपूरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बार्शीटाकळी बस स्टॅण्ड, तारफैल, बाळापूर, खदान, घुसर व कौलखेड येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान काल (दि.7) रोजी रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या एकुण रुग्ण संख़्या व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
एकाचा मृत्यू
दरम्यान आज खाजगी हॉस्पीटल येथून एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण सातव चौक, जठारपेठ येथील 61 वर्षीय पुरुष असून तो दि. 25 नोव्हेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
20 जणांना डिस्चार्ज
ददरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ जण, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून एक, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून दोन, अशा एकूण 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
655 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9705(7748+1780+177) आहे. त्यातील 301 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8749 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 655 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा