462 अहवाल प्राप्त; 33 पॉझिटीव्ह, 19 डिस्चार्ज


अकोला,दि. 9 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 462 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 429 अहवाल निगेटीव्ह तर 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि.8) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  9742(7781+1784+177) झाली आहे. आज दिवसभरात 19  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  57145 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 55731  फेरतपासणीचे 258 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1156 नमुने होते. आजपर्यंत एकूण 57082 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 49301 तर पॉझिटीव्ह अहवाल 9742(7781+1784+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 33 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व 24 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जठारपेठ  येथील तीन जण, खदान व रामनगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित छोटी उमरी, रामदासपेठ, किर्ती नगर, अकोट, तोष्णिवाल लेआऊट, रसनापूर ता. बाळापूर, पारस, निमवाडी, तापडीया नगर, अकोला बसस्टॅण्ड, पातूर, गोरक्षण रोड, माळराजूरा ता. पातूर, सावरगाव ता. पातूर, जून राधाकिसन प्लॉट, सुधीर कॉलनी, व्हिएचबी कॉलनी, व्दारका नगर, नायगाव, मलकापूर, बिर्ला कॉलनी, जसनागरा समोर, नवीन तारफैल, जूने लेबर कॉलनी, डाबकी रोड व आळशी प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान काल (दि.8) रोजी रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या एकुण रुग्ण संख़्या व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

19 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून तीन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून चारसूर्यचंद्रा हॉस्पीटल येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून दोन, अकोला ॲक्सीडेंट क्लिनिक येथून चार अशा एकूण 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

673 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9742(7781+1784+177) आहे. त्यातील 301 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8768 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 673 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना