91 अहवाल प्राप्त; 11 पॉझिटीव्ह, 12 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

 


अकोला,दि.7 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 91 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 80 अहवाल निगेटीव्ह तर 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज खाजगी हॉस्पीटल येथे दोघांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.6) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  9677(7723+1777+177) झाली आहे. आज दिवसभरात 12  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  56419 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 55016  फेरतपासणीचे 253 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1150 नमुने होते. आजपर्यंत एकूण 56303  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 48580 तर पॉझिटीव्ह अहवाल 9677(7723+1777+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 11 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील आदर्श कॉलनी येथील दोन, तर उर्वरित तोष्णीवाल लेआऊट व खदान येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात सात पुरुषाचा समावेश असून ते संताजी नगर, खेतान नगर, अकोट, गीता नगर, मोठी उमरी, खदान व कौलखेड येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान काल (दि.6) रोजी रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या एकुण रुग्ण संख़्या व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

दोघांचा मृत्यू

दरम्यान आज खाजगी हॉस्पिटल येथून दोघांचे मृत्यू झाले. त्यात पारस ता. बाळापूर येथील 56 वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना 21 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते, तर मांजरी ता. बाळापूर येथील 65 वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना 5 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

12 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून दोन, अशा एकूण 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

648 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9677(7723+1777+177) आहे. त्यातील 300 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8729 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 648 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना