1167 अहवाल प्राप्त; 24 पॉझिटीव्ह, 19 डिस्चार्ज, एक मयत

 


अकोला,दि. 12 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1167 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1143 अहवाल निगेटीव्ह तर 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.11) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 9854(7876+1801+177) झाली आहे. आज दिवसभरात 19  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  60765 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 59226  फेरतपासणीचे 262 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1277 नमुने होते. आजपर्यंत एकूण 60479  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची 52603 तर पॉझिटीव्ह अहवाल 9854(7876+1801+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 24 पॉझिटिव्ह

 आज दिवसभरात 24  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी 16 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व 12 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील खडकी व कापशी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित आलेगाव, आपातापा, बोरगाव खु., आस्टूल ता. पातूर, तेल्हारा, भौरद, जिएमसी हॉस्टेल,  उरळ, जवाहर नगर, मयूर कॉलनी, न्यू राधाकिशन प्लॉट व गायगाव येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात चार महिला व  चार पुरुषाचा समावेश आहे. त्यात जठारपेठ येथील तीन, रणपिसे नगर  येथील दोन तर उर्वरित वाडेगाव, केडीया प्लॉट व मुलांचे वसतीगृह येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री (दि. 11) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

19 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 12, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, हॉटेल रिजेंसी येथून दोन,  हॉटेल स्कायलार्क येथून एक, अशा एकूण 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण अकोट येथील 68 वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्यांना 9 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

735 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9854(7876+1801+177) आहे. त्यातील 302 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8817 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 735 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा