जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारणार


अकोला,दि.16 (जिमाका)- राज्य निवडणुक आयोगाने जाहिर केल्यानुसार अकोला जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. उमेदवारांना आपल्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी करावयाचा अर्ज http://bartievaliditymaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येतील, असे जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोलाचे उपायुक्त तथा सदस्य सचिव यांनी कळविले आहे.

या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या प्रत्रकात म्हटले आहे की, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याकरीता दि. 1 ऑगस्ट पासून ऑनलाईन प्रणालीव्दारे पद्धती अवलंबण्यात आली आहे. यापुर्वी निवडणुकीसाठी हस्तलिखित अर्ज स्विकारण्यात येत होते, मात्र सद्यस्थितीत ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज स्विकारण्यात येत आहेत. तेव्हा उमेदवारांनी संकेतस्थळावर परिपुर्ण माहिती भरावी. त्याची मुळ प्रत जातपडताळणी समितीच्या कार्यालयात सादर करावी. उमेदवार विवाहित महिला असल्यास त्यांनी माहेरकडील पुरावे सादर करावे. उमेदवाराचे मुळ पुरावे ज्या जिल्ह्यातील असतील त्याच जिल्ह्यातील जातीचे प्रमाणपत्र त्या जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करावा, असे ही समिती मार्फत कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ