रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 116 चाचण्या, चार पॉझिटिव्ह
अकोला,दि.15 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 116 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात अकोट येथे दोन, बार्शीटाकळी येथे
15, तेल्हारा येथे 10, अकोला आयएमए येथे चार, आरोग्य कर्मचारी 37 चाचण्या झाल्या त्यात
कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 46 चाचण्या होऊन चार जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कुणीही पॉझिटीव्ह
आले नाही. आतापर्यंत जिल्ह्यात 27 हजार 157 रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी
1865 पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा
प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा