917 अहवाल प्राप्त; 48 पॉझिटीव्ह, नऊ डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि. 16(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 917 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 869 अहवाल निगेटीव्ह तर 48 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  दरम्यान एका रुग्णाचा उपचार घेतांना रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर नऊ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.15) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  9980(7986+1817+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  63871 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 62312 फेरतपासणीचे 264 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1295 नमुने होते. आजपर्यंत एकूण 63756 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 55770 तर पॉझिटीव्ह अहवाल 9980(7986+1817+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 48 पॉझिटिव्ह

 आज दिवसभरात 48  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 13 महिला व 18 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी, चोहट्टा बाजार व न्यु आळशी प्लॉट येथील प्रत्येकी तीन, राम नगर, दुर्गा चौक, गीता नगर, वर्धमान नगर व उरळ ता. बाळापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पिकेव्ही, दिनोडा, मुर्तिजापूर, कृषि नगर, अकोट, मलकापूर, न्यू तापडीया नगर, आरोग्य नगर, जठारपेठ, कौलखेड, लहान उमरी व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी  17 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व 15 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दोनद खु. ता. बार्शीटाकळी व तेल्हारा येथील प्रत्येकी चार, गोरक्षण रोड व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बाळापूर रोड, अकोट, चंद्रिकापूर ता. अकोट, पारद व राऊतवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री (दि.15)रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण उरळ ता. बाळापूर येथील 60 वर्षीय पुरुष असून तो दि. 14 डिसेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

नऊ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात व  आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, अशा एकूण नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

688 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9980(7986+1817+177) आहे. त्यातील 306 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8986 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 688 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ