३९३ अहवाल प्राप्त; ३३ पॉझिटीव्ह, ७२ डिस्चार्ज, एक मयत

 अकोला,दि. २९(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे  ३९३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३६० अहवाल निगेटीव्ह तर ३३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर ७२ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान आज एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.२८) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  १०४२४ (८३८१+१८६६+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  ६९६२८ जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६७९९१ फेरतपासणीचे २७८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३५९ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६९४४३ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६१०६२ तर पॉझिटीव्ह अहवाल १०४२४ (८३८१+१८६६+१७७) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज ३३ पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात ३३  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व तीन पुरुष आहेत. त्यातील चार जण हे रामदास पेठ येथील तर उर्वरीत बीसीएचएस पॉलिक्लिनिक, केशव नगर. व्याळा, देशमुख फाईल, कोर्ट क्वार्टर आणि राजपुत पुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात आठ महिला व १५ पुरुष आहेत. त्यात मुर्तिजापुर येथील तीन, अकोली जहांगिर ता. अकोट येथील तीन, राधाकिसन प्लॉट येथील तीन,अकोट येथील दोन, गोरक्षण रोड येथील दोन,  आदर्श कॉलनी येथील दोन तर उर्वरित राजंदा, मलकापूर, धामना, जोगळेकर प्लॉट,  खडकी, कौलखेड, तोष्णीवाल ले आऊट, डॉ. किबे दवाखाना येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.

काल (दि.२८) रात्री रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्याचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे. याची कृपया नोंद घ्यावी.

७२ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून  पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून चार तर होम आयसोलेशन मधील  ५४ अशा ७२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतांना एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. ते बोरगाव मंजू येथील रहिवासी होते. त्यांना दि.२३ रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा काल रात्री मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

४८३ रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या १०४२४ (८३८१+१८६६+१७७) आहे. त्यातील ३१९ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची ९६२२ संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ४८३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ