ग्रा.पं. निवडणूक 2020-21 अकोला जिल्ह्यासाठी निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती

 


            अकोला,दि. 18(जिमाका)-  जिल्ह्यात होवू घातलेल्या एकूण 225 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक  निवडणूकीसाठी  विभागीय आयुक्त अमरावती यांनी एका आदेशाव्दारे निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती केली आहे.

            या आदेशात म्हटल्याप्रमाणे, अकोला जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी अकोला, अकोला तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी अकोट, मुर्तिजापूर व बार्शिटाकळी तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी बाळापूर तर बाळापूर व पातूर तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर यांची निवडणुक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

            जिल्ह्यात अकोट तालुक्यात 38, तेल्हारा तालुक्यात 34, अकोला तालुक्यात 36, मुर्तिजापूर तालुक्यात 29, बार्शिटाकळी तालुक्यात 27, बाळापूर तालुक्यात 38 व पातुर तालुक्यात 23 अशा एकूण 225 ग्रामपंचायतीच्या निवडणूक होवू घातल्या आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ