2017-18 ची तुर-चना खरेदी अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तालुका खरेदी केंद्रांवर संपर्क करावा जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांचे आवाहन

 

अकोला,दि.8 (जिमाका)- शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सन 2017-2018 मध्ये तुर व चना खरेदीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. मात्र धान्य खरेदीसाठी एसएमएस देण्यात आले नाही, अशा शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कार्यालयास प्राप्त झाली आहे. यातील बहुतेक शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन वर्ग करण्यात आली आहे. तथापि, काही शेतकऱ्यांचे बँक खाते बंद असणे, बँक खाते आधार संलग्न नसणे, मोबाईल नंतर चुकीचा असणे या व अन्य तांत्रिक कारणामुळे संपर्क होत नाही. तरी अशा शेतकऱ्यांनी बुधवार दि. 10 पर्यंत तालुका खरेदी केंद्रावर संपर्क करुन आपले आधार कार्ड, बँक पासबुकाची झेरॉक्स प्रत जमा करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अकोला यांनी केले आहे.अन्यथा अनुदानाची रक्कम शासनास परत जाईल, असेही कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना