रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 138 चाचण्या, आठ पॉझिटिव्ह


अकोला,दि.21 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 138 चाचण्या झाल्या त्यात आठ अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे 36 चाचण्या होऊन दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तेल्हारा येथे 12 चाचण्या होऊन एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर बार्शिटाकळी येथे तीन, मुर्तिजापूर येथे पाच, अकोला आयएमए येथे चार, आरोग्य कर्मचारी येथे 37 चाचण्या झाल्या त्यात कुणीही  पॉझिटीव्ह आले नाही. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 36 चाचण्या होऊन तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, हेगडेवार लॅब येथे पाच चाचण्या होऊन दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  आतापर्यंत जिल्ह्यात 27 हजार 917 रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी 1899 पॉझिटीव्ह आले आहेत,  असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ