तालुकास्तरावर मोटार वाहन नोंदणी, तपासणी व अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन

 


अकोला,दि.21 (जिमाका)- मोटार वाहन निरिक्षक यांच्या मार्फत  जिल्ह्यातील तालुकास्तरावर मोटार वाहन नोंदणी, तपासणी, वाहन चालक व अनुज्ञप्ती याकरीता शिबिराचे आयोजन जानेवारी ते जून 2021 या कालावधीमध्ये  होणार आहे. या नियोजीत शिबीर जानेवारी महिण्यात बाळापूर येथे  दि. 5 18 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 8 22 रोजी, अकोट येथे दि. 13 25 रोजी, तेल्हारा येथे दि. 7 15 रोजी, पातूर येथे दि. 6 20 रोजी, तर बार्शिटाकळी येथे 4 27 रोजी होईल, फेब्रुवारी महिण्यात बाळापूर येथे  दि. 5 18 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 8 22 रोजी, अकोट येथे दि. 12 26 रोजी, तेल्हारा येथे दि. 18 25 रोजी, पातूर येथे 4 24 रोजी, बार्शीटाकळी येथे 9 23 रोजी होईल.

 मार्च महिण्यात बाळापूर येथे  दि. 5 19 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 10 22 रोजी, अकोट येथे दि. 12 26 रोजी, तेल्हारा येथे दि. 4 16 रोजी, पातुर येथे 8 24 रोजी,  तर बार्शिटाकळी येथे 9 25 रोजी होईल, एप्रिल महिण्यात बाळापूर येथे  दि. 5 16 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 9 23 रोजी, अकोट येथे दि. 12 26 रोजी, तेल्हारा येथे दि. 8 19 रोजी, पातुर येथे 7 22 रोजी,  तर बार्शिटाकळी येथे 6 20 रोजी होईल, मे महिण्यात बाळापूर येथे  दि. 7 21 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 6 19 रोजी, अकोट येथे दि. 12 24 रोजी, तेल्हारा येथे दि. 3 17 रोजी, पातुर येथे 5 20 रोजी,  तर बार्शिटाकळी येथे 4 25 रोजी होईल, तर जुन महिण्यात बाळापूर येथे  दि. 7 21 रोजी, मुर्तिजापूर येथे दि. 10 24 रोजी, अकोट येथे दि. 11 25 रोजी, तेल्हारा येथे दि. 4 18 रोजी, पातुर येथे 3 22 रोजी,  तर बार्शिटाकळी येथे 8 23 रोजी होईल.

अर्जदारांनी वरिल तारखेस आवश्यकते प्रमाणे parivahan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन sarathi.nic.in या पोर्टलवर आपले कामाकरिता ऑनलाईन अपॉयमेन्ट घेणे आवश्यक आहे. अपॉयमेन्ट असणाऱ्याच अर्जदारांची अर्ज स्विकारण्यात येतील, असे प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ