शासकीय वसतीगृहासाठी अकोट येथे खाजगी जागेची आवश्यकता

 


अकोला,दि.31(जिमाका)- अकोट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहाकरीता खुल्या जमीनीची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील मागासवर्गीय मुलांमुलींचे शिक्षण सुखकर व सोयीचे व्हावे. तसेच त्यांना सोयीसुविधा व्हावी यासाठी अकोट शहरातील मोक्याच्या ठिकाणी बांधकाम करण्यायोग्य कमीतकमी दोन एकर खाजगी जमीन शासकीय  वसतीगृहासाठी आवश्यक आहे. इच्छुक जमीन मालकांनी व व्यक्तींनी अकोट शहरात किवा शहरालगत असलेली जमीनी विक्रीयोग्य आहे त्यानी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अकोला येथे संपर्क करावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा