403 अहवाल प्राप्त; 35 पॉझिटीव्ह, 29 डिस्चार्ज, एक मयत

 


अकोला,दि. 23(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 403 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 368 अहवाल निगेटीव्ह तर 35 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान एका रुग्णाचा उपचार घेतांना रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर 29 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.22) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  10261(8233+1851+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  67368 जणांचे  पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 65768 फेरतपासणीचे 272 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1328 नमुने होते. आजपर्यंत एकूण 67216 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 58983 तर पॉझिटीव्ह अहवाल 10261(8233+1851+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 35 पॉझिटिव्ह

 आज दिवसभरात 35  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व 26 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील सहा, गोरक्षण रोड, गिता नगर, राम नगर व जवाहर नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बाळापूर, दोनद बु. ता. बार्शिटाकळी, उज्वलेश्वर ता. बार्शिटाकळी, पिकेव्ही परिसर, संजय नगर, मेहरे नगर, जगदंबा मंदिर, कौलखेड, लहान उमरी, रजतपूरा, अकोला जहागीर ता. मुर्तिजापूर, हातगाव ता.मुर्तिजापूर, तापडीया नगर, रामदास पेठ, मोठी उमरी, खापरखेड व केशवनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी  चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील उरळ ता. बाळापूर येथील तीन तर निपाना अकोला येथील एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री (दि.22)रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

29 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, युनिक हॉस्पीटल येथील दोन तर ओझोन हॉस्पीटल येथील एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 16, अशा एकूण 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज खाजगी रुग्णालयातून एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण तोष्णीवाल लेआऊट, अकोला येथील 67 वर्षीय महिला असून ती दि. 13 डिसेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

784 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 10261(8233+1851+177) आहे. त्यातील 313 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 9164 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 784 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ