आर्थिक साक्षरता आणि ग्राहक जागृती वेबिनारचे ऑनलाईन संपन्न

 


अकोला,दि.19 (जिमाका)-  कन्झुमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडीया आणि शासकीय औद्योगिक  प्रशिक्षण संस्था (मुलींची) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि. १९) रोजी कन्झुमर आणि फायनांन्शियल लिटरसी इन कोविड-19 टाइमया विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले.

शासकीय औद्योगिक  प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथील समस्त प्रशिक्षणार्थी तसेच कर्मचारी वृंद यांनी या वेबिणार मध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या वेबिनारमध्ये कन्झुमर गायडंस सोसायटी ऑफ इंडीया चे प्रोजेक्ट संचालक टी. आर. पांडेय यांनी ग्राहक जागृतीबाबत महत्वपूर्ण माहिती प्रदान केली तसेच ग्राहकांचे हक्क, अधिकार आणि कर्तव्य यांची सविस्तर माहिती यावेळी दिली.  फायनांन्शियल लिटरसी या विषयावर माहिती देतांना  नंदकुमार मेनन यांनी, ग्राहकांनी आपल्या आर्थिक अधिकाराच्या हक्काचे रक्षण कसे करावे तसेच आर्थिक गुंतवणुकीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच यानिमित्ताने केंद्र तसेच राज्य सरकारने केलेल्या विविध कायद्यांची माहिती यावेळी करून दिली.

आयटीआय मुलींची अकोलाचे प्राचार्य  राम मुळे यांनी वेबिनारच्या सुरुवातीला प्रशिक्षनार्थीना मार्गदर्शन करून ग्राहक हक्कांचे महत्व प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन  मंगेश पुंडकर यांनी केले. वेबिनारच्या यशस्वितेकरीता भालचंद्र दिगंबर तसेच संस्थेच्या सर्वच निदेशक वृन्दांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाकरीता गटनिर्देशिका व सर्व निर्देशक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन संयोजक मंगेश पुंडकर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ