आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन हक्कासोबत कर्तव्याची जाणीव ठेवा

 



 

अकोला,दि.10 (जिमाका) -  प्रत्येकाने आपल्या हक्का सोबत कर्तव्याची जाणीव  ठेवावी. कर्तव्याच्या जाणीवा शिवाय हक्काचे पालन होवू शकत नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानवी हक्कदिन आज गुरुवार (दि. 10) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात आयोजीत करण्यात आला त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, श्रीकांत देशपांडे,  जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके,  विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश अंधारे, मानवधिकार वृत्त मासिकाचे मुख्य संपादक विजय कुमार गडलिंगे, पाणी फाऊंडेशनचे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्यावर अन्याय झाल्यास त्यासाठी मानवी हक्क आयोगाकडे दाद मागावी, असे प्रतिपादन विजय कुमार गडलिंगे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तर सुत्रसंचालन गुणवत्ता विकास कक्षाचे समन्वयक गजानन महल्ले यांनी केले. तसेच उपस्थितांचे आभार विधी अधिकारी संदिप ककांळे यांनी मानले.

यावेळी  जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे, नितीन निंबुळकर, साबळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ