रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 197 चाचण्या, चार पॉझिटिव्ह

 


अकोला,दि.3 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 197 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात  बार्शीटाकळी येथे 27 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉ‍झिटिव्ह आला, तेल्हारा येथे 38 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉ‍झिटिव्ह आला, अकोट येथे 14, मुर्तिजापूर येथे एक व आयएमए येथे 12 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉ‍झिटिव्ह आला नाही, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 52 चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 52 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर हेडगेवार प्रयोगशाळेत एकाची चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे एकूण 197 जणांच्या चाचण्या होऊन चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंत 25673 चाचण्या झाल्या त्यात 1807 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना