९२ अहवाल प्राप्त; १४ पॉझिटीव्ह, १६ डिस्चार्ज, दोन मयत

 अकोला,दि. २८(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे  ९२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७८ अहवाल निगेटीव्ह तर १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर १६ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान आज दोन जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचेही जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.२७) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  १०३९०(८३४८+१८६५+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  ६९२१४ जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६७५८० फेरतपासणीचे २७८ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३५६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६९०५१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६०७०३ तर पॉझिटीव्ह अहवाल १०३९०(८३४८+१८६५+१७७) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज १४ पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सकाळी  १४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात  तीन महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तीन जण मोठी उमरी येथील, दोन जण हिवरखेडा, दोन जण विठ्ठल नगर,  तर उर्वरीत कौलखेड, डिएसपी ऑफिस जवळ,  तोष्णीवाल लेआऊट,  जिल्हा न्यायालय क्वार्टर्स,  रामदास पेठ, दुर्गाचौक व व्याळा येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी कुणाचाही अहवाल प्राप्त झाला नाही.

 

दरम्यान काल (दि.२७) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यात कुणाचेही अहवाल पॉझिटीव्ह आले नाहीत, याची नोंद घ्यावी.

१६ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, आयकॉन हॉस्पिटल मधून दोन, स्कायलार्क हॉटेल येथून तीन, हॉटेल रिजेन्सी मधुन एक व बिहाडे हॉस्पिटल येथून दोन असे  १६ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

दरम्यान आज  दोन जणांचे मृत्यू झाले. त्यात एका ९२ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना दि.२२ रोजी दाखल करण्यात आले होते. आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. ते पातूर येथील रहिवासी होते.  तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका ८१ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. ते वानखडे नगर डाबकी रोड येथील रहिवासी होते.  त्यांना दि.२३ रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज पहाटे मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

५२२ रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या १०३९०(८३४८+१८६५+१७७) आहे. त्यातील ३१८ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची ९५५० संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ५२२ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ