ग्रा.पं. निवडणुक २०२०-२१ जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

 

 

अकोला,दि. 15(जिमाका)- जिल्ह्यात 532 ग्रामपंचायतींपैकी 225 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.  निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दि. 28 फेब्रुवारीपर्यंत आहे. नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यपत्र किवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या दिनांकापासून 12 महिन्याच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणापत्र सादर करील, असे हमीपत्र सादर करण्याची मूभा उमेदवारांना दिली  असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने पत्राव्दारे निर्देशीत केले आहे.  

            राज्यनिवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक २०२०-२१ च्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून उमेदवारांकडून विहित नमुन्यातील हमीपत्र व जातपडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची  पोचपावती घेवून नामनिर्देशनपत्र स्विकारण्याबाबत सर्व संबंधित निवडणूक अधिकारी व संबंधित उमेदवरांना अवगत करावे, असेही पत्रात नमूद केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ