382 अहवाल प्राप्त; 61 पॉझिटीव्ह, 17 डिस्चार्ज


अकोला,दि.4 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 382 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 321 अहवाल निगेटीव्ह तर 61 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि.3) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  9595(7659+1759+177) झाली आहे. आज दिवसभरात 17  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 55322 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 53932  फेरतपासणीचे 252 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1138 नमुने होते. आजपर्यंत एकूण 55270 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 47611 तर पॉझिटीव्ह अहवाल 9595(7659+1759+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 61 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 61 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 55 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 21 महिला व 34 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सेंट्रल जेल येथील 13,  गोरक्षण रोड, बसेरा कॉलनी, शास्त्री नगर, रणपिसे नगर व गीता नगर येथील प्रत्येकी तीन, गणेश नगर, जुने शहर, मोठी उमरी, राम नगर व मलकापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित भारती प्लॉट, तेल्हारावल्लभ नगर, जठारपेठआदर्श कॉलनी, किनखेड पूर्णा, अडगाव बु. ता. तेल्हारा, बाजोरिया नगर, बिर्ला कॉलनी, व्यंकटेश नगर, जीएमसी बॉय  हॉस्टेल, तुकाराम चौक, न्यू जैन मंदिर, व्याळा ता. बाळापूर, कान्हेरी सरप ता. बार्शीटाकली, राउतवाडी व बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. त्यातील गणेश नगर छोटी उमरी येथील पाच जण तर सेंट्रल जेल येथील एक, याप्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान काल (दि.3) रोजी रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या एकुण रुग्ण संख़्या व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

17 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून एक, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक, तर बिऱ्हाडे हॉस्पिटल येथून एकअशा एकूण 17 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

620 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9595(7659+1759+177) आहे. त्यातील 296 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8679 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 620 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना