651 अहवाल प्राप्त; 28 पॉझिटीव्ह, 23 डिस्चार्ज

 


अकोला,दि.6 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 651 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 623 अहवाल निगेटीव्ह तर 28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि.5) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  9660(7712+1771+177) झाली आहे. आज दिवसभरात 23  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 56419 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 55017  फेरतपासणीचे 253 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1149 नमुने होते. आजपर्यंत एकूण 56212  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 48500 तर पॉझिटीव्ह अहवाल 9660(7712+1771+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 28 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड येथील सहा, तोष्णीवाल लेआऊट येथील तीन, खदान येथील दोन, तर उर्वरित न्यु खेतान नगर, विद्यूत कॉलनी, बाळापूर, सहित ता. बार्शीटाकळी, जनूना ता. बार्शीटाकळी, राजूराघाट धोत्रा, तापडीया नगर, पातूर, बार्शीटाकळी, केशवनगर, किनखेड, सिटी कोतवाली समोर, आश्रय नगर, नंदापूर ता. पातूर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरूष असून ते रतनलाल प्लॉट व राम मंदिर जवळ अकोला येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान काल (दि.5) रोजी रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या एकुण रुग्ण संख़्या व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

23 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, ओझोन हॉस्पीटल येथून पाच, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, सूर्यचंद्रा हॉस्पिटल येथून एक, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून तीन, अशा एकूण 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

645 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9660(7712+1771+177)  आहे. त्यातील 298 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8717 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 645 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना