नाफेड मार्फत तूर खरेदी;ऑनलाईन नोंदणी सुरु

 अकोला,दि.२८ (जिमाका)- खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत तूर खरेदीसाठी  ऑनलाईन प्रक्रिया आज (दि.२८) पासून सुरु झाली असून शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या  खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अकोला यांनी केले आहे. या नोंदणीसाठी  ऑनलाईन सातबारा उतारा (त्यात २०२०-२१ च्या तूर पिक पेऱ्याची नोंद आवश्यक). आधार कार्ड झेरॉक्स प्रत, आधार संलग्नित  बॅंक खाते पासबुकाची स्पष्ट दिसणारी झेरॉक्स प्रत सोबत जोडावी,असेही  जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ