291 अहवाल प्राप्त; 25 पॉझिटीव्ह, 15 डिस्चार्ज, दोन मृत्यू


अकोला,दि.5 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 291 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 266 अहवाल निगेटीव्ह तर 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज दोघांचे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.4) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  9626(7684+1765+177) झाली आहे. आज दिवसभरात 15  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 55684 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 54292  फेरतपासणीचे 252 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1140 नमुने होते. आजपर्यंत एकूण 55561 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 47877 तर पॉझिटीव्ह अहवाल 9626(7684+1765+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 25 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड  येथील चार, राम नगर व गजानन नगर डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित  लक्ष्मी नगर, पातूर, डाबकी रोड, काँग्रेस नगर, आदर्श कॉलनी, तोष्णीवाल लेआऊट, सिंधी नगर, पारस, बापरी ता. मूर्तिजापूर, उमरा ता. पातूर, साष्टी ता. पातूर, तुलंगा ता. पातूर, बार्शीटाकली, बाजोरिया नगर, छोटी उमरी, कैलास टेकडी निमवाडी व कवर नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान काल (दि.4) रोजी रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या एकुण रुग्ण संख़्या व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

15 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, अकोला अँक्सीडेंट  क्लीनिक येथून एक तर बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून तीन, अशा एकूण 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

दोघांचा मृत्यू

दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात पंचशील नगर येथील 72 वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना 27 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते, तर धारेल ता. अकोट येथील 65 वर्षीय महिला असून ती 28 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आली होती. तिचा उपचार दरम्यान मुत्यू झाला.

634 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9626(7684+1765+177) आहे. त्यातील 298 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8694 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 634 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना