रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 64 चाचण्या, सहा पॉझिटिव्ह
अकोला,दि.6 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात आज दिवसभरात झालेल्या 64 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात अकोला ग्रामीण,
अकोट, बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. तसेच आरोग्य
कर्मचाऱ्यांच्या 27 चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 37 जणांच्या
चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर हेडगेवार प्रयोगशाळेत चाचण्या झाल्या नाही, असे एकूण 64 जणांच्या चाचण्या
होऊन सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंत 26126 चाचण्या झाल्या त्यात
1825 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा
प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा