महानगर पालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


अकोला,दि. 22(जिमाका)- महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व फैलाव  कमी होण्याकरीता महानगर पालिका क्षेत्रामध्ये  22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021  या कालावधीत रात्रीची संचारबंदी (रात्रीचे 11.00 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत) लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहे. 
शासकीय तसेच खाजगी अब्युलन्स सेवा, रात्रीच्या वेळेस सुरु राहणारी औषधीचे दुकाने, रात्रीच्या वेळेस सुरु राहणारे पेट्रोलपंप, भाजीपाला विक्री, दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी, रेल्वेने तसेच एस.टी बस व खाजगी वाहनाने उतारणाऱ्या प्रवाशाकरीता ॲटोरिक्षा यांना संचारबंदीचे कालावधीमध्ये मुभा राहील.  हे आदेश दि. 22 डिसेंबरपासून संपूर्ण अकोला महानगर पालिका क्षेत्राकरिता लागू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ