86 अहवाल प्राप्त; 11 पॉझिटीव्ह, 20 डिस्चार्ज


अकोला,दि. 21(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 86 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 75 अहवाल निगेटीव्ह तर 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 20 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.20) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  10184(8165+1842+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  66510 जणांचे  पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 64922 फेरतपासणीचे 271 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1317 नमुने होते. आजपर्यंत एकूण 66232 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 58067 तर पॉझिटीव्ह अहवाल 10184(8165+1842+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 11 पॉझिटिव्ह

 आज दिवसभरात 11  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी येथील तीन, निमखर्डा ता. बाळापूर व कुटासा ता. अकोट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बाळापूर, राम नगर, सिद्धी कॅम्प व डाबकी रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी  कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

दरम्यान काल रात्री (दि.20)रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

20 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, युनिक हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, ओझोन हॉस्पीटल येथून एक तर हॉटेल रिजेन्सी येथून तीन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले तीन, अशा एकूण 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

786 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 10184(8165+1842+177) आहे. त्यातील 311 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 9087 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 786 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ