1147 अहवाल प्राप्त; तीन पॉझिटीव्ह, 24 डिस्चार्ज, एक मयत


अकोला,दि. 13 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1147 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1144 अहवाल निगेटीव्ह तर तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज एकाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.12) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 9864(7879+1808+177) झाली आहे. आज दिवसभरात 24  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  61958 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 60410 फेरतपासणीचे 262 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1286 नमुने होते. आजपर्यंत एकूण 61626  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची 53747 तर पॉझिटीव्ह अहवाल 9864(7879+1808+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज तीन पॉझिटिव्ह

 आज दिवसभरात तीन  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील चिखलगाव, शिवणी व कौलखेड  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

दरम्यान काल रात्री (दि. 12) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

24 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 17, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, युनिक हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेंसी येथून दोन,  हॉटेल स्कायलार्क येथून दोन, अशा एकूण 24 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एक मयत

दरम्यान आज खाजगी हॉस्पिटल येथे एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण गड्डम प्लॉट,अकोला येथील 92 वर्षीय महिलाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. तिला 3 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आली होती.

720 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9864(7879+1808+177) आहे. त्यातील 303 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8841 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 720 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम