क्रीडांगण विकास अनुदान 24 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव आमंत्रित


 

            अकोला,दि.10(जिमाका)- जिल्ह्यात क्रिडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार जोपासना करण्यासाठी तसेच ग्रामीणशहरी भागात खेळविषयक सूविधा निर्माण करण्याकरीता जिल्हा क्रीडा कार्यालय मार्फत, क्रीडांगण विकास अनुदान योजना राबविण्याकरीता सन 2020-21 2021-22 या वर्षाकरीता परिपूर्ण प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

या योजनेंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200 व 400 मीटरचा धवनपथ तयार करणे, क्रीडांगणास भिंतीचे किवा तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अनेक प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृहचेंजिंग रूम बांधणे, पिण्याच्या मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहीत्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडांणावर फ्लड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचासिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरीआसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरीवर आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे, निर्मित सुविधा विचारात घेवुन मैदानावर पाणी मारण्यासाठी स्पिंकलर यंत्रणा बसविणे मैदानावर रोलींग करण्यासाठी हॅन्ड मिनी लोअर खरेदी करणे त्यादी बाबींकरीता अनुदान मंजूर करण्यात येते.

अनुदानासाठी पात्र संस्थांसाठी प्राधान्यक्रम असा राहील, स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालीका, जिल्हा परिषद, कंन्टोनमेंट बोर्ड, शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पोलीस कल्याण निधीपोलीस विभाग, शासकीय कार्यालये तसेच जिल्हा परिषद, आदिवासी विकास सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा वसतीगृह, तसेच शालेय शिक्षण क्रीडा विभाग उच्च शिक्षण विभाग यांनी मान्यता दिलेल्या शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवून 5 वर्ष पुर्ण झालेले शाळा, अनुदानीत महाविद्यालये अनुदानासाठी पात्र राहतील.

            आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उपरोक्तपणे नमुद संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेवुन दि. 24 डिसेंबर पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दोन प्रतीत या जिल्हा क्रीडा कार्यालयास कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ