आधुनिक दुग्धव्यवसाय उद्योजकता विकास प्रशिक्षण: कंपनी म्हणून चालवा दुधाचा व्यवसाय- डॉ. एस.पी. गायकवाड

 



अकोला,दि.२७ (जिमाका)-  दुधाचा व्यवसाय करतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व प्रक्रिया करुन दुधाची विविध उत्पादने बनवून तरुणांनी तो एक कंपनी म्हणून चालवावा, असे प्रतिपादन पशुतज्ज्ञ व उद्योजक गोविंद डेअरी फलटण जि. साताराचे महाव्यवस्थापक डॉ. एस. पी. गायकवाड, यांनी केले. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत  स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, कृषिनगर, अकोला तर्फे दि. २१ ते २५ या कालावधीत ऑनलाइन आधुनिक दुग्धव्यवसाय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून  डॉ. गायकवाड बोलत होते.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत  स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, कृषिनगर, अकोला यांच्या वतीने या ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत कमी खर्चात शास्त्रोक्त पद्धतीने दुग्धव्यवसाय उद्योजकता विकास कसा करावा? यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विषयतज्ज्ञांनी  मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उदघाटन पशुतज्ज्ञ व उद्योजक गोविंद डेअरी फलटण जि. साताराचे महाव्यवस्थापक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून उद्गीर येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. माधव पाटील, व आयडीबीआय बँक, नागपूरचे व्यवस्थापक डॉ. नंदकिशोर अकोटकर हे उपस्थित  होते.  

या प्रशिक्षण कार्यक्रमात दुग्ध व्यवसाय उद्योजकता विकासासाठी उद्योजकाच्या मानसिकतेचा विकास, किफायतशीर मुक्त संचार गोठा, मुरघास निर्मिती, प्रजनन व्यस्थापन, रोगनियंत्रण, एकात्मीक पशुपालन, टाकाउपासून टिकाउ व मुल्यवर्धित दुग्ध पदार्थ आदी विषयांवर डॉ. शैलेश मदने (मुंबई), डॉ चंद्रप्रकाश खेडकर (वरूड),  डॉ. साईनाथ भोकरे (सातारा), डॉ. अजय खानविलकर (सातारा), डॉ. विजय केळे (गुजरात), डॉ. प्रफुल्ल पाटील (छत्तीसगड), डॉ. आरीफ शेख (संगमनेर), डॉ.संदिप रिंधे (परभणी),  डॉ. वैभव लुले (वरूड), प्रा. डॉ. अनिल भिकाणे, डॉ. अभय कुलकर्णी, व मुकुंद गिरी, डॉ. प्रशांतकुमार कपले (अकोला) यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षण  समन्वयक डॉ. प्रशांतकुमार  कपले यांनी  केले. तर कार्यक्रम समारोप प्रसंगी संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. अनिल भिकाने,  प्रा. डॉ प्रशांत वासनिक, अधिष्ठाता, दुग्ध तंत्रज्ञान, मपमविवि, नागपूर,  प्रा. डॉ नितिन मार्कडेंय,  सहयोगी अधिष्ठाता, परभणी व डॉ संतोष शिंदे हे उपस्थीत होते.

                        या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील ५१  विविध क्षेत्रातील नवउद्योजक,  शेतकरी,  पशुपालक,  दुग्ध व्यावसायिक, कृषि पदवीधरक, अभियंते, डॉक्टर्स, सुशिक्षित बेरोजगार युवक व बचत गटातील महिला यांनी सहभाग नोंदवून पाच दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण घेतले.

            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. प्रशांतकुमार कपले तसेच  सहसमन्वयक डॉ. दिलीप बदुकले, डॉ. गिरीश पंचभाई, डॉ. मोहिनी खोडके, डॉ. कुलदीप देशपांडे, डॉ. मंगेश वड्डे, डॉ. नरेश कुलकर्णी व गजानन वाघ यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ