रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 93 चाचण्या, तीन पॉझिटिव्ह
अकोला,दि.18 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात आज दिवसभरात झालेल्या 93 चाचण्या झाल्या त्यात तीन
जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात अकोट येथे 19, तेल्हारा येथे नऊ, अकोला आयएमए येथे पाच, आरोग्य कर्मचारी येथे 30 चाचण्या झाल्या त्यात
कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 30 चाचण्या होऊन
तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, आतापर्यंत जिल्ह्यात 27 हजार 533 रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी 1880 पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा
प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा