रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 84 चाचण्या, सात पॉझिटिव्ह

अकोला,दि.10 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 84 चाचण्या झाल्या त्यात सात  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे 14 मुर्तिजापूर येथे पाच चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे एकाची चाचणी झाली त्यात एकाचा  अहवाल पॉझिटीव्ह आला,  तसेच  अकोला आयएमए येथे आठ व आरोग्य कर्मचारी येथे 23 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 32 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, हेडगेवार प्रयोगशाळा येथे एकाची चाचणी झाली त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,  असे एकूण 84 जणांच्या चाचण्या होऊन सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंत 26583 चाचण्या झाल्या त्यात 1843 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ