12 व 13 डिसेंबर रोजी राज्‍यस्‍तरीय महारोजगार मेळाव्‍याचे आयोजन

 


 

            अकोला,दि.3 (जिमाका)-  रोजगाराच्‍या विविध संधी तसेच विविध क्षेत्रात रोजगाराच्‍या नवनवीन संधी उपलब्‍ध करुन देण्‍यांच्‍या दृष्‍टीने राज्‍यात 12 व 13 डिसेंबर 2020 रोजी दोन दिवसांच्‍या कालावधीत एक राज्‍यस्‍तरीय महारोजगार मेळाव्‍याचे आयोजन  कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता, आयुक्‍तालय नवी मुंबई याचे विद्यमाने करण्‍यांत आलेले  आहे

            सदर मेळाव्‍यामध्‍ये नामांकित खाजगी उद्योजक, कंपनी व त्‍यांचे प्रतिनिधी विविध पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबव‍तील.  दहावी, बारावी, आय.टी.आय.,पदवीका व पदवीधारक  पात्र पुरुष व महिला उमेदवारांना  ऑनलाईन अप्‍लॉय करुन या ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात सहभागी होता येईल.

            कौशल्‍य विकास व उद्योजकता विभागाच्‍या -  www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर नांव  नोंदणी केलेल्‍या दहावी,  बारावी, पदवी, आयटीआय पास, पदवीका, पदवी पुरुष तसेच  महिला  उमेदवारांनी आपल्‍या सेवायोजन कार्ड ( Employment Card ) चा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्‍या लॉगीन मधुन ऑनलाईन अप्‍लॉय करु शकतात. ऑनलाईन अप्‍लॉय केलेल्‍या उमेदवारांच्‍या कंपनी, उद्योजक व एच.आर.प्रतिनिधी यांचे कडून ऑनलाईन मुलाखती घेऊन निवड प्रक्रीया राबवितील.         तरी जास्‍तीत जास्‍त  उमेदवारांनी आपल्‍या शैक्षणीक पात्रतेच्‍या आधारे ऑनलाईन अप्‍लॉय करण्‍याचे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रां.यो.बारस्‍कर  यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा