492 अहवाल प्राप्त; 18 पॉझिटीव्ह, 97 डिस्चार्ज, दोन मयत

 


अकोला,दि. 24(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 492 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 474 अहवाल निगेटीव्ह तर 18 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान दोन रुग्णाचा उपचार घेतांना रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर 97 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.23) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  10280(8251+1852+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  67890 जणांचे  पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 66270 फेरतपासणीचे 273 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1347 नमुने होते. आजपर्यंत एकूण 67708 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 59457 तर पॉझिटीव्ह अहवाल 10280(8251+1852+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 18 पॉझिटिव्ह

 आज दिवसभरात 18  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी 18 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व 14 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जठारपेठ, कौलखेड, तेल्हारा व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित मोठी उमरी, मोरगाव कडाड, मंगरुळ काम्बे ता.मुर्तिजापूर, गीता नगर, डाबकी रोड, शास्त्री नगर, बार्शिटाकळी, मोहिते प्लॉट, राजपुतपुरा व बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.   तसेच आज सायंकाळी  कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

दरम्यान काल रात्री (दि.23)रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

97 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 11, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून एक, तर बिहाडे हॉस्पीटल येथून चार तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 80, अशा एकूण 97 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

दोघांचे मृत्यू

दरम्यान आज खाजगी रुग्णालयातून दोघांचे मृत्यू झाले. त्यात तेल्हारा येथील 69 वर्षीय पुरुष असून त्याना दि. 14 डिसेंबर रोजी दाखल झाले होते. त्याचा उपचार घेतांना मृत्यू झाला, तर रजतपुरा येथील 64 वर्षीय पुरुष असून त्याना दि. 21 डिसेंबर रोजी दाखल झाले होते. त्याचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

784 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 10280(8251+1852+177) आहे. त्यातील 315 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 9261 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 704 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ