रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 48 चाचण्या, तीन पॉझिटिव्ह

 अकोला,दि. 13(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 48 चाचण्या झाल्या त्यात तीन  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोला ग्रामीण, अकोट, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा, मुर्तिजापूर व अकोला आयएमए येथे चाचण्या झाल्या नाही. तर  आरोग्य कर्मचाऱ्यांचे  13 चाचण्या झाल्या त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 35 चाचण्या झाल्या त्यात तीन जण पॉझिटिव्ह आले,  आतापर्यंत जिल्ह्यात 26 हजार 940 रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी 1859 पॉझिटीव्ह आले आहेत,  असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ