रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 159 चाचण्या, सात पॉझिटिव्ह

 


अकोला,दि. 12(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 159 चाचण्या झाल्या त्यात सात  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे चार, बार्शीटाकळी येथे एक, तेल्हारा येथे 75, मुर्तिजापूर येथे दोन, अकोला आयएमए येथे तीन, आरोग्य कर्मचारी 15 याप्रमाणे चाचण्या झाल्या त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 51 चाचण्या झाल्या त्यात सहा जण पॉझिटिव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे आठ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला,  आतापर्यंत जिल्ह्यात 26 हजार 692 रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी 1856 पॉझिटीव्ह आले आहेत,  असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ