768 अहवाल प्राप्त; 24 पॉझिटीव्ह, 21 डिस्चार्ज


अकोला,दि. 10 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 768 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 744 अहवाल निगेटीव्ह तर 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि.9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  9770(7805+1788+177) झाली आहे. आज दिवसभरात 21  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  57969 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 56550  फेरतपासणीचे 261 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1158 नमुने होते. आजपर्यंत एकूण 57850 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 50045 तर पॉझिटीव्ह अहवाल 9770(7805+1788+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 24 पॉझिटिव्ह

आज दिवसभरात 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 13 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित मलकापूर, मोठी उमरी, र्किती नगर, वाडेगाव, मुर्तिजापूर, जय हिंद चौक, मुझफर नगर, न्यु खेतान नगर, तेल्हारा, मुकूंद नगर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात पाच महिला व  सहा पुरुषाचा समावेश आहे. त्यात गोरक्षण रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित बोरगाव मंजू, जठारपेठ, माळीपूरा, मलकापूर, शास्त्री नगर, राम नगर, व पातूर येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान काल (दि.9) रोजी रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या एकुण रुग्ण संख़्या व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

21 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 13, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथून एक, ओझोन  हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, अशा एकूण 21 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

680 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9770(7805+1788+177) आहे. त्यातील 301 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8789 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 680 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ