243 अहवाल प्राप्त; 13 पॉझिटीव्ह, 109 डिस्चार्ज

 


अकोला,दि. 30(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे  243 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 230 अहवाल निगेटीव्ह तर 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 109 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.29) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 10445(8394+1874+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 69747 जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 68105 फेरतपासणीचे 279 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1363 नमुने होते. आजपर्यंत एकूण 69686 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 61292 तर पॉझिटीव्ह अहवाल 10445(8394+1874+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 13 पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात 13  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यातील आश्रय नगर येथील तीन, आदर्श कॉलनी व बाबुळगाव येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित जीएमसी हॉस्टेल, कॉग्रेस नगर, मुंडगाव, टेलीग्राफ कॉलनी मुकूंद नगर, माधव नगर व दत्ता कॉलनी गोरक्षण रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी  कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

काल (दि. 29) रात्री रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्याचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे. याची कृपया नोंद घ्यावी.

109 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, ओझोन हॉस्पीटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून एक तर बिहाडे हॉस्पीटल येथून चार तसेच होम आयसोलेशन मधील 96, अशा एकूण 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

395 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 10445(8394+1874+177) आहे. त्यातील 319 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 9731 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 395 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम